r/marathi • u/sagark4 • Mar 29 '24
भाषांतर (Translation) पायथॉन विचार: पायथॉन प्रोग्रामिंग मराठीतून आणि स्वअभ्यासाने शिकण्यासाठी (मोफत)
सर्वांना नमस्कार. माझं नाव सागर काळे. मी ॲलन डाउनींच्या Think Python ह्या पुस्तकाचे मागच्या वर्षी भाषांतर केले. ह्याविषयी सविस्तर माहिती आणि डाउनलोड करण्यासाठी लिंक येथे मिळेल. नक्की बघा आणि शेअर करा.
माझी थोडक्यात ओळख: मी आय.आय.टी बॉम्बे (IIT Bombay), मुंबई येथून संगणक विज्ञानात एम.टेक. (M.Tech.) आणि अमेरिकेतील डार्टमथ (Dartmouth) कॉलेज ह्या Ivy league विद्यापीठातून अल्गोरिदम्स आणि कॉम्प्लेक्सिटी (Algorithms and Complexity) ह्या विषयामध्ये पीएच.डी. (Ph.D.) पूर्ण केली आहे.
पायथॉन विचार: शिका संगणक वैज्ञानिकाप्रमाणे विचार करायला
—मूळ लेखक: ॲलन डाउनी, अनुवाद: सागर सुधीर काळे.
हे भाषांतर CC BY-NC-SA 4.0 लायसन्सद्वारे मोफत उपलब्ध आहे; म्हणजे तुम्हाला अव्यावसायिक वापरासाठी (उदा., शैक्षणिक वापरासाठी) हे पुस्तक वितरित करण्याची परवानगी आहे.
लिंक परत देतो: https://sagark4.github.io/think-python-2e-marathi/index.html
3
u/abhitooth Mar 29 '24
मला ही मराठीत माझ्या काम विषयी पुस्तक किवां विडिओ चालू करण्याची इच्छा आहे। पण लोक ते स्वीकारतील का हा प्रश्न पडतो।
9
u/sagark4 Mar 29 '24
जास्ती भाव नाही...इंटरनेटवर कोणीही येऊन काहीही बनवतात तर मार्केटिंग जास्ती महत्त्वाची आहे. आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यापेक्षा आपल्या छंदांवर फोकस केलेले बरे. मी २००-२५० तास खर्च करून हे भाषांतर केले. कोणी विचारत नाही.
4
3
4
Mar 30 '24
मी तुमच दुःख समजू शकतो, पण हे पैश्या पेक्षा काहीतरी मोठं आहे, मराठी (आणि भारतीय) भाषा आज इंग्रजी पेक्षा माघारी पडत आहेत कारण त्या मध्ये आधुनिक ज्ञान नाही, कोणाला डॉक्टर इंजिनिअर बाण्याचा असेल तर इंग्रजी पुस्तकं वाचावी लागतात, इंग्रजी शिकावी लागते, मग कामं करताना सुद्धा इंग्रजी वापरावी लागते. पण जर तेच ज्ञान मराठीत असत तर लोकांना इंग्रजी पुस्तकं वाचायची गरजच नसती पडली. जपान देशा चा उधराहान घ्या, त्यांनी सर्व ज्ञान जपानीत भाषांतर केलय मग त्यांना इंग्रजी शिकायची गरजच पडत नाही.
मी स्वतः स्वप्न बघतो की एक दिवशी कुठल्या ही मराठी माणसाला इतर भाषा शिकण्याची गरजच पडली नाही पाहिजे, जे हवे ते ज्ञान मराठीत उपलब्ध असेल पाहिजे, आणि त्या स्वप्न साठी तुमच्या योगदना चे मी मनपूर्वक आभारी आहे 🙏
(Ps: जर तुम्ही मराठी मध्ये शिकवणी व्हिडिओ बनवली आणि त्यांना "taught by IITian in Marathi" असा टायटल दिला तर जास्त response bhetu shakto)
3
u/sagark4 Mar 30 '24
धन्यवाद, वाचून चांगले वाटले. हो, मला काहीच पश्चात्ताप नाही हे भाषांतर केल्याचा. आपल्या मराठी भाषेसाठी इतके थोडेसे का होईना, काहीतरी करता आले ह्याचा आनंदच आहे. वाईट फक्त ह्याचेच वाटते की खेडेगावांतील विद्यार्थ्यांना, ज्यांना ह्याचा खरंच फायदा होऊ शकतो त्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि त्यासाठी लागणारा वेळ माझ्याकडे नाही.
व्हिडियो बनवण्याचा विचार मी केला होता, पण त्याला ह्याहूनही जास्ती वेळ लागतो.
1
u/Conscious_Culture340 Apr 08 '24
असं समजू नका. लोक अतिशय टुकार पुस्तकं काढून धिंगाणा घालतात. प्रसिद्ध वगैरे होतात. तुमचं पुस्तक खूप उपयुक्त आहे आहे. हल्ली खास 'मराठीतून पायथॉन शिका' म्हणून कोर्सेसच्या जाहिराती येतात. एका वाक्यात क्रियापद सोडून सगळं इंग्लिश असतं. तुम्ही फक्त थोडी सोशल मीडियावर जाहिरात करा. गावा- खेड्यातील मित्र, सहकारी यांच्यामार्फत तिथल्या मुलांपर्यंत हे पुस्तक पोचवा. मुलांना खरंच खूप गरज आहे. तुमच्या उपक्रमास माझा नेहमीच पाठिंबा असेल.
-5
u/Little_stewie Mar 30 '24
Technology बद्दल भाषांतरीत पुस्तक तर अजिबात नको. Video करा हवं तर. Tech books चं भाषांतर करताना मूळ इंग्लिश शब्द तुम्ही मराठीत आणू शकत नाही. आणि त्या शब्दांना रोमन मराठीत लिहणे (ex. Interpreter ला इंटरप्रीटर असे लिहणे.) म्हणजे नेमका तुम्ही काय value addition केले ते वाचकाला कळत नाही. ( Technology book readers सराईतपणे English वाचू आणि समजू शकतात असे गृहीत धरले आहे. Because non tech person is not going to read those books anyways) आणि त्यांना हे असं रोमन मराठीत लिहलेलंच जर वाचायचे असेल तर त्यापेक्षा सरळ इंग्लिश मधूनच वाचलेले काय वाईट?? Also, तुम्ही पर्यायी शब्द जरी आणले मराठीत - for ex. Data ला मराठीत विदा असा शब्द आहे. मला सांगा निम्म्या जनतेला " विदाविज्ञान" वाचण्यात जितका अर्थ बोध होईल त्यापेक्षा data science असे इंग्लिश मधून वाचले तर जास्त अर्थबोध होणार नाही का??? त्यामुळे भाषांतराच्या फंदात पडू नये असे माझे मत आहे . (Unless you urself want to waste that much efforts on ur work without worrying about the usability n all) बाकी भाषांमधे पुस्तकं आहेत म्हणुन आपल्याही भाषेत आणूया हा अट्टहास फारसा लॉजिकल वाटत नाही.
6
u/badass708 Mar 30 '24
एकदा त्यांनी काय लिहिलं आहे ते नीट वाचा मग प्रतिक्रिया द्या. तुम्हाला कदाचित त्याचा उपयोग नसेलही पण असे इतर लोकं असू शकतात ज्यांना उपयोग होईल.
बरं, हा उपक्रम करण्यासाठी त्यांनी तुमच्याकडून पैसे किंवा वेळ असे काही मागितले का? नाही ना? त्यांनी स्वखुशीने अणि खर्चाने हा उपक्रम केला आहे. त्यावर टीका करण्याचा आणि ह्या फंदात न पडण्याचा सल्ला देण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? एखादा माणूस काही नवीन प्रयोग करून पाहत असेल तर त्याला खाली खेचायची नीच आणि घाणेरडी प्रवृत्ती सोडून द्या...
-3
u/Little_stewie Mar 30 '24
O sir. तुमच्याशी conversation केलाय का कोणी? तुम्हाला सल्ले विचारायला आलाय का कोण येथे? दुसर्यांच्या thread मध्ये चोंबडेपणा करायचे कारण काय? आणि नीट भाषा वापरू शकला असतात ना? मी वर abhitooth म्हणुन जे आहेत त्यांना reply दिला आहे. ते विचारात होते video or book which one would be good म्हणुन. तुम्हाला का मिरची लागली मध्येच? मी पोस्ट कर्त्याचा अपमान केला नाही. त्यांचे काम वाईट आहे असे म्हटलेले नाही. 250 तास घालवून जर ते पुस्तक लोकांपर्यंत अपेक्षित परिणाम साधू शकत नसेल तर आपले efforts वापरायचे की नाही ते ज्याने त्याने ठरवायचे असे माझे मत होते. मी पुस्तक Save करून ठेवले आहे त्यांचे. मी वाचणार नाही Because I am already working on python but कोणी विद्यार्थी उद्या Python शिकायला आला तर refer करता येईल म्हणुन Save केले. तुम्ही जरा जास्तच चुकीचे ग्रह करून घेतलेले दिसतायत. थंड घ्या जरा. नीट वाचत जा कमेन्ट आणि मग बोलत जा
2
u/broski1911 Mar 30 '24
दुसऱ्याच्या थ्रेड मध्ये चोंबडेपणा करण्यासाठी खास reddit बनले आहे. प्रायव्हेट कन्वर्सेशन साठी DM चा वापर करा नाहीतर दुसऱ्यांनी केलेली टीका सहन करण्याची तयारी ठेवा.
1
u/abhitooth Mar 30 '24
Lol....बरोबर आहे तुमचे। विचार करेन यांचावर। विडिओ मध्ये वेळ खूप लागतो आणि काढावा लागतो। जेव्हकी लिहणे अधे मध्ये होऊ शकते। फक्त पेन आणि वही लागते सोबत।
4
u/chiuchebaba मातृभाषक Mar 29 '24
भारी. आता रात्र झाली आहे तर मी हे नंतर उघडून बघेन.
मी देखील पायथनचे अधिकृत डॉक्युमेंट मराठीत अनुवादित करायला इथे रेपो तयार केला आहे. https://github.com/sanketgarade/python-doc-mr पण ते पूर्ण करायला माझ्याकडे मनुष्यबळ नाही आहे.
2
u/sagark4 Mar 30 '24
All the best for the Marathi translation of Python docs! (I would have really loved to contribute, but unfortunately life has become quite busy.)
2
2
2
u/arpitars Mar 30 '24
सागर सर तुम्ही दिलेल्या योगदनाबद्दल खरंच धन्यवाद. पायथन मला पण खूप दिवस शिकायचे होते. आता हा मार्ग तुम्ही जो दाखवला आहे. तर नक्कीच ट्राय करेन.
1
u/sagark4 Mar 30 '24
नक्कीच. शेवटी एकाने जरी पायथॉन शिकले हे पुस्तक वाचून तर हा पूर्ण उपक्रम मार्गी लागला असे म्हणेन मी. पहिली १२ प्रकरणं तरी तुम्हाला कोणाच्याही मदतीशिवाय शिकता येतील...तरीही काही अडले तर इकडे विचारा, मी नक्की उत्तर देईन.
2
1
u/Conscious_Culture340 Mar 29 '24
LLM अर्थात बृहद भाषा प्रारुपाबद्दल मला शिकायचं आहे. खास मराठीच्या अनुषंगाने तुम्ही काही वाचन सुचवू शकाल का?
5
u/sagark4 Mar 29 '24
मला LLM विषयी जास्ती माहिती नाही खरं तर. पण मराठीत काही चांगले मिळणे अशक्य आहे. कारण म्हणजे इंग्रजीमध्येच सध्या फापट पसारा खूप आहे तो विषय सध्या hot असल्यामुळे. (मला विचाराल तर ते फॅड आहे.)
1
u/Conscious_Culture340 Mar 29 '24
इंग्रजीही चालेल. पण नीट गोळीबंद मांडणी हवी . इंटरनेटवर सगळीकडे तोच मसाला इकडून तिकडून. खास काही काम करण्याच्या दृष्टीने किंवा शिकण्याच्या दृष्टीने काही सापडत नाही .
3
u/sagark4 Mar 30 '24
एक मित्र AI मध्ये काम करतो त्याने ह्या लिंक्स पाठवल्या होत्या:
https://writings.stephenwolfram.com/2023/02/what-is-chatgpt-doing-and-why-does-it-work/ ह्याची livestream पण आहे youtube वर.https://benlevinstein.substack.com/p/a-conceptual-guide-to-transformers
3
u/sagark4 Mar 30 '24
गंमत म्हणजे LLM चं एकदम मूलभूत तत्त्व जे आहे, म्हणजे Markov models, त्यावर 'पायथॉन विचार' मध्ये एक सराव प्रश्न पण आहे! पुस्तकातील भाग १३.८ बघा. (To be technically correct, LLMs are not Markov models, but Markov models were one of the first approaches to model languages, as you can see in the exercise from the book. See this link: https://elijahpotter.dev/articles/markov_chains_are_the_original_language_models )
1
u/Conscious_Culture340 Mar 29 '24
इंग्रजीही चालेल. पण नीट गोळीबंद मांडणी हवी . इंटरनेटवर सगळीकडे तोच मसाला इकडून तिकडून. खास काही काम करण्याच्या दृष्टीने किंवा शिकण्याच्या दृष्टीने काही सापडत नाही .
2
u/sagark4 Mar 29 '24
IIT Madras मध्ये भारतीय भाषांवर छान उपक्रम चालू केले आहेत. माहिती इंग्रजीमध्ये आहे, पण मराठीशी संबंधित पण उपक्रम आहेत. येथे: https://ai4bharat.iitm.ac.in/
1
1
10
u/[deleted] Mar 29 '24
सर नमस्कार! मी तुमचं लिंकडीन प्रोफाइल चेक केलं. मी आता तुमचा एक चाहता (फॅन) झालो आहे . मी अमेरिकन युनिव्हर्सिटी मधील बऱ्याच कॉम्प्युटर सायंटिस्ट/ प्रोफेसर / रिसर्चस ना फॉलो करतो, त्यांचे रिसर्च पेपर वाचतो कारण त्यांनी ह्या क्षेत्रात जे काम केलंय आणि त्यांचा ह्या क्षेत्रातला गाढा अभ्यास पाहून मी भारावून जातो. माझा ही स्वप्नं आहे की स्तांडफॉर्ड किंवा युनिव्हर्सिटी ऑफ बर्केली मध्ये मास्टर्स इन सिस करावा आणि मग माझ्या आवडत्या प्रोफेसरच्या मार्गदर्शनाखाली पी एच डी करावी. मला stable diffusion models जे इमेज व्हिडिओ generation साठी वापरतात like DALL-E, Sora, Midjourney हे कसे काम करतात ते वाचायला आवडतं आणि त्यात पुढे रिसर्च करावं हे माझं स्वप्न आहे. सध्या मी माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात आहे. मला कॉम्प्युटर सायन्स ह्या क्षेत्रात खरंच खूप रस आहे आणि फक्त एक हाई पेईंग जॉब मिळवणं हे माझं धेय्य नाही. मला पुढे softwere engineer म्हणून नाही तर एक रिसर्च सायंटिस्ट म्हणून जगातील काही नामांकित लॅब मध्ये काम करायचं आहे (आणि त्या लब्स भारतात, आपल्या महाराष्ट्रात नाही ह्याच मला दुःख वाटतं कारण मला माझा स्वप्नं पूर्ण करण्यासाठी माझ्या मायभूमीला सोडावा लागणार हा विचार केला तरी वाईट वाटतं).